पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनासाठी केंद्र सरकारने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC, बीबीसी) च्या प्रमुखांना पत्र लिहिले, ज्यामध्ये २६ लोक ठार झाले होते. (Pahalgam Terror Attack)
दहशतवादी हल्ल्याचे वर्णन करतांना दहशतवाद्यांना दहशतवादी (Terrorists) न म्हणता अतिरेकी (Militants) म्हटले आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालय बीबीसीच्या वृत्तांकनावर लक्ष ठेवणार आहे, असे या नोटिसीत म्हटले आहे.
बीबीसीने काय दिले वृत्त ?
काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ‘पाकिस्तानने भारतियांसाठी व्हिसा निलंबित केला’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केल्यानंतर सरकारने हा इशारा दिला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे की, हे शीर्षक दिशाभूल करणारे आहे आणि भारताला एक खुनी म्हणून चुकीचे चित्रित करते. काही इंटरनेट वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, हेडलाइनवरून असे दिसते की, भारताने काश्मीरमध्ये पाकिस्तानी पर्यटकांना मारले. सत्य उलट आहे. सरकारने आपल्या पत्रात “दहशतवादी” ऐवजी “अतिरेकी” म्हणून करण्यावरही भाष्य केले आहे.
केंद्राने बीबीसीविरुद्ध ही कारवाई अशा दिवशी केली आहे, जेव्हा त्यांनी भारताविरुद्ध संवेदनशील सामग्री आणि चुकीची माहिती” पसरवल्याबद्दल पाकिस्तानमधील १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सर्वोच्च पातळीवर आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित केला, द्विपक्षीय संबंध कमी केले आणि अटारी चेकपोस्ट बंद केली आहे. (Pahalgam Terror Attack )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community