Green Mumbai : झोपडपट्ट्यांमधील सर्व प्रकारच्या स्वच्छता कामांसाठी आता नव्याने विभाग निहाय संस्था

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी तसेच घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असला तरी ही योजना आता बंद करण्यात येणार असून यापुढे विभाग निहाय कचरा उचलण्यासह विविध प्रकारची स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी एकाच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

2307
Green Mumbai : झोपडपट्ट्यांमधील सर्व प्रकारच्या स्वच्छता कामांसाठी आता नव्याने विभाग निहाय संस्था
Green Mumbai : झोपडपट्ट्यांमधील सर्व प्रकारच्या स्वच्छता कामांसाठी आता नव्याने विभाग निहाय संस्था

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai Awareness Campaign) अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी तसेच घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असला तरी ही योजना आता बंद करण्यात येणार असून यापुढे विभाग निहाय कचरा उचलण्यासह विविध प्रकारची स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी एकाच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai Awareness Campaign) अंतर्गत करण्यात येणारी स्वच्छतेची कामे योग्य प्रकारे होत नसल्याची बाब समोर आल्याने ही मोहिम गुंडाळून एकाच संस्थेवर सर्व प्रकारच्या स्वच्छतेची कामे सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Green Mumbai)

झोपडपट्टी विभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai Awareness Campaign) अंतर्गत प्रती १५० एककासाठी लोकसहभागाद्वारे ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो. तसेच घरोघरी जाऊन कचरा गोळा करून स्वच्छता राखली जाते. या कामांसाठी संस्थेची नेमणूक केली जात आहे. यापूर्वीच्या दत्तक वस्ती योजनेचे नाव बदलून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या (Swachh Mumbai Awareness Campaign) नावाखाली झोपडपट्टी भागात स्वच्छता राखण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन समाधानी नाही. (Green Mumbai)

(हेही वाचा – Agniveer Scheme : मनोज नरवणे यांचा पुस्तकातून अग्नीवीर योजनेविषयी खुलासा; म्हणाले केंद्र सरकारने…)

सध्या झोपडपट्टी (Slums) परिसरातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता एकाच संस्थेकडे स्वच्छता राखण्यासह कचरा उचलून नेणे आणि विभागातील शौचालयाच्या सफाईचे काम सोपवण्याचा विचार केला जाणार आहे. त्याअनुषंगाने स्वच्छतेच्या कामांसाठी विभाग निहाय संस्थेची नेमणूक करून पुढील दोन महिन्यांमध्ये झोपडपट्टीतील चित्र पालटवून टाकण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. यासर्व स्वच्छतेच्या कामांचे ऑडीट केले जाणार असून त्यानुसार ज्या नियुक्त संस्था चांगल्या काम करतील त्यांना प्रोत्साहनात्मक पैसेही दिले जातील, असाही प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत सध्या असलेल्या ४० हजार सफाई कामगारांकडून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न होत आहे. हा सर्व सफाई कामगार पुरेसा असून या सर्व कामगारांमध्ये शिस्तीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त आणून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Green Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.