आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७१ ऑक्सिजन निर्मिती प्लांट!

कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याकरता महापालिकेने ३२० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत.

100

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७१ ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहे. तब्बल ३२० कोटी रुपयांचे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले जाणार असून यासाठीच्या निविदा महापालिका प्रशासनाने मागवल्या आहेत.

कोविड सेंटरची डागडुजी करताना ऑक्सिजन जोडणीही करणार!

मुंबई महापालिकेच्यावतीने वरळी डोम, वांद्रे कुर्ला संकुल, नेस्को, भायखळा, दहिसर, मुलुंड आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभरण्यात आले आहेत. याठिकाणी सध्या ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था असली तरी कायमस्वरुपी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या कोविडची रुग्णसंख्या कमी झाल्याने विद्यमान कोविड सेंटर बंद करून त्यांची डागडुजी हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ऑक्सिजन वाहिन्यांच्या जोडणीही करण्यात येत आहे.

(हेही वाचा : जून महिन्यातच पवई तलाव भरला!)

सुमारे ३२० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या!

कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना याची बाधा अधिक होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीकोनातून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स तसेच आयसीयू बेडसची संख्या अधिक वाढवावी लागणार असल्याने ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारण्याकडे महापालिकेने लक्ष दिले आहे. सुमारे ३२० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ७१ ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले जाणार असून या सर्वांमधून १ लाख ३ हजार ४६० एलपीएम एवढा ऑक्सिजन वायूची निर्मिती होणे अपेक्षित मानले जात आहे. याशिवाय या १२ ठिकाणी ७१ प्लांट उभारताना २३ अतिरिक्त कॉम्प्रेसर देण्याचीही अट या निविदेत घालण्यात आली आहे. परंतु रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांटमध्ये प्रशासनाने ज्याप्रकारे एका ठराविक कंपनीला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवली, तशाचप्रकारे जर जंबो कोविड सेंटरबाबत झाल्यास महापालिकेच्या यंत्रणेवरील लोकांचा असलेला नसलेला विश्वासही उडेल.

अशाप्रकारे उभारले जाणार ऑक्सिजन प्लांट

ग्रुप वन :

एनएससीआय, वरळी : २ प्लांट ( १२०० एलपीएम)

कांदळपाडा, दहिसर : २ प्लांट ( २१६० एलपीएम)

पोद्दार हॉस्पिटल, वरळी : २ प्लांट ( २६०० एलपीएम)

के जे सोमय्या ग्राऊंड म्हाडा : १० प्लांट (१५,००० एलपीएम)

ग्रुप दोन :

वांद्रे कुर्ला संकुल पी वन : २ प्लांट ( ३००० एलपीएम)

वांद्रे कुर्ला संकुल पी टू : २ प्लांट ( ४५०० एलपीएम)

दहिसर चेकनाका : २ प्लांट ( ३००० एलपीएम)

नेस्को, गोरेगाव : १० प्लांट ( १५,००० एलपीएम)

(हेही वाचा : मुंबईत नाले, गटारांत कचरा टाकणा-यांवर आता कडक कारवाई)

ग्रुप तीन :

कांजूरमार्ग : १४ प्लांट ( २१,००० एलपीएम)

रिचडसन क्रुडास, मुलुंड : ५ प्लांट ( ७५०० एलपीएम)

ग्रुप चार :

मालाड : १४ प्लांट ( २१,००० एलपीएम)

रेसकोर्स, वरळी : ५ प्लांट ( ७,५०० एलपीएम

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.