UIDAI : आधार अपडेट साठी आता २४/७ ‘टोल-फ्री हेल्पलाइन’

ही हेल्पलाईन आधारबाबतच्या कोणत्याही चौकशीसाठी सर्वसमावेशक उपाय आहे.

96
UIDAI : आधार अपडेट साठी आता २४/७ 'टोल-फ्री हेल्पलाइन'
UIDAI : आधार अपडेट साठी आता २४/७ 'टोल-फ्री हेल्पलाइन'

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) वतीने १९४७ या क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आधारशी संलग्न समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन चोवीस तास सुरु राहणार आहे. नागरिकांना आधारकार्ड अपडेट करण्यासाठी कुठेही जावे न लागता मोबाईलवरच अपडेट करता येणार आहे.

जन्मतारीख, नाव, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील अद्ययावत करणे असो, की पीव्हीसी कार्डबद्दल माहिती शोधणे असो, ही हेल्पलाईन, आधारबाबतच्या कोणत्याही चौकशीसाठी सर्वसमावेशक उपाय आहे. त्याशिवाय या हेल्पलाईनच्या मदतीने नागरिकांना त्यांच्या EID/UID ची सद्यःस्थिती तपासता येईल, घर नोंदणी सेवांसाठी सहाय्य मिळेल आणि अद्ययावतीकरणाची विनंती फेटाळली गेली, तर त्यामागचे कारण समजू शकेल. नागरिकांचे आधारशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही सेवा सुरु केली आहे.

या सेवेचा वापर करण्यासाठी, नागरिक त्यांच्या लँडलाइन किंवा मोबाईल फोनवरून १९४७ क्रमांक डायल करू शकतात. ही हेल्पलाईन १२ भाषांमधील संवादासाठी सक्षम असून, सहाय्य मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करते. वापरकर्त्यांकडे स्वयंचलित IVRS प्रणाली द्वारे मार्गदर्शन मिळवण्याचा किंवा वैयक्तिक सहाय्य मिळवण्यासाठी आधार केअर एक्झिक्युटिव्हशी थेट संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध असेल.अद्ययावतीकरणाची विनंती नाकारली गेली, तर १९४७ क्रमांकार कॉल करून याबाबतचे कारण जाणून घेता येईल आणि पुन्हा विनंती करण्यापूर्वी आवश्यक ती सुधारणा करण्याचा मार्ग उपलब्ध राहील.

(हेही वाचा : Manhole Covers Theft : मुंबईच्या मॅनहोल झाकणांचे गुजरात कनेक्शन)

कशी काम करणार ही हेल्पलाईन
कॉल केल्यावर नागरिकांना एसएमएसद्वारे संवाद क्रमांक त्वरित जारी केला जातो, ज्याच्या सहाय्याने ते आपल्या तक्रार निवारणाबाबतच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील. याशिवाय, आधार कार्ड एक्झिक्युटिव्हबरोबर हा संवाद क्रमांक सामायिक करून तक्रारीची सद्यःस्थिती तपासता येईल. ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद करायचा आहे, त्यांना आपले प्रश्न, अभिप्राय, सूचना आणि तक्रारी देखील पुढील ईमेलवर पाठवता येतील. [email protected]. त्याशिवाय पुढील अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दखल करता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.