साध्या एसटी बसेस मुंबई-पुणे एक्सप्रेसवरून धावणार नाहीत; कारण… 

144

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहे. एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्याने त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्याने जवळपास ३० ते ५० टक्के प्रवासी भारमान घटले.

टोलमुळे घेतला निर्णय 

एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, आता एसटीच्या साध्या बस या जुन्या मार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवनेरी वगळता इतर एसटी बसने एक्स्प्रेसवेवरून प्रवास केल्यास त्या दरम्यान ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम चालकाकडून वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्याशिवाय, अशा चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील, एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होती. मात्र, काही चालक परस्पर एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असे. ही बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेंगळुरू, मंगलोर मार्गाकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस आता जुन्या मुंबई-पुणे मार्गे धावणार आहेत. जुन्या मुंबई-पुणे हायवेवर एका बसला ४८५ रुपये टोल (जात-येता) द्यावा लागतो. तर नवीन एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी त्याच बसला रुपये ६७५ टोल(जाता-येता ) द्यावा लागतो. एका बसमागे एका फेरीमागे १९० रुपयांचा भुर्दंड पडतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.