नायजेरियन नागरिक १६ लाखांच्या कोकेनसह थेट सांगलीत!

१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

71

सांगली येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एडवर्ड जोसेफ इदेह (३५) या नायजेरियन तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई इस्लामपूर पोलिसांनी केली आहे. दरम्यान न्यायालयाने त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बॅंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून शर्मा ट्रॅव्हल्स या खाजगी बसमधून एक संशयित व्यक्ती कोकेन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री पोलीसांनी वाळवा तालुक्यातील पेठनाका येथील न्यू मणिकंडन हॉटेलजवळ सापळा लावला.

(हेही वाचा – “कोण अजित पवार? मी नाही ओळखत”, नारायण राणेंचा हल्लाबोल)

संशयास्पद नायजेरियन अंगझडती 

पोलिसांनी शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसची झडती घेतली. पोलिसांना एक संशयास्पद नायजेरियन तरुण बसमध्ये आढळला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शॅम्पूची ६५० मिलीची काळ्या रंगाची बाटली आढळून आली. त्या बाटलीत १६४ ग्रॅमच्या कोकेन कॅप्सूल होत्या. हे कोकेन सुमारे १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे आहे. पोलिसांनी सदर नायजेरियन तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.