Express Fire: नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला आग

अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथक पाठवण्यात आले आहे.

112
Express Fire: नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला आग
Express Fire: नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला आग

नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला आग (Express Fire) लागल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक ०२५७० एक्सप्रेसला उत्तर प्रदेशातील सराय भोपत रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्याची घटना घडली. या आगीत अनेक बोगी जळून खाक झाल्या आहेत.

एस १ कोटमध्ये धूर असल्याचे पाहून स्टेशन मास्तरने ट्रेन तात्काळ थांबवली. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एक्सप्रेसला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथक पाठवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.