NCC : ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

143

जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ गुरूवारी, ३ ऑगस्ट रोजी व्हायरल झाला असून याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा सगळीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना दुर्दैवी असून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.

एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे. बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. त्याचा व्हिडीओ मात्र गुरूवारी व्हायरल झाला. याबाबत महाविद्यालयाच्या संबंधित विद्यार्थ्यावर कारवाईची भूमिका घेतली आहे. प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या की, ज्याने मारहाण केली तो विद्यार्थी विज्ञान शाखेचा आहे. कालच या घटनेबाबत वि.प्र.मंकडे कारवाईसाठी पाठवले होते. एनसीसीने आतापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. हे घडत असताना दोन मुले तिथे आली असती तर ही घटना तिथल्या तिथे थांबवता आली असती. त्या विद्यार्थ्यावर कारवाई होणार आहे.

(हेही वाचा Vadhavan Port : वाढवण बंदर उभारण्यासाठी मिळाली परवानगी)

मिळालेल्या माहितीनुसार ही २६ जुलै रोजीची घटना आहे. लायब्ररीमधून एका माजी विद्यार्थिनीने हा व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओ बनवणारी ही विद्यार्थीनी फक्त अभ्यासासाठी येत होती. तिला बाहेरून ओरडताना आवाज आला आणि व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ स्टेटसला ठेवला, ज्यांनी स्टेटसला व्हिडीओ पाहिला त्या दोन – तीन जणांनी तो व्हिडिओ शेअर केला आणि तो आज प्रसारमाध्यमातून व्हायरल झाला. जिने व्हिडिओ काढला तिची तक्रार नाही, विद्यार्थ्यांची तक्रार अजून आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.