Navi Mumbai Traffic Department : केवळ दोन तासातच सीट बेल्ट न लावणाऱ्या ‘९०५’ जणांवर कारवाई

नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष उपक्रमाद्वारे करण्यात आली मोहीम

149
Navi Mumbai Traffic Department : केवळ दोन तासातच सीट बेल्ट न लावणाऱ्या '९०५' जणांवर कारवाई
Navi Mumbai Traffic Department : केवळ दोन तासातच सीट बेल्ट न लावणाऱ्या '९०५' जणांवर कारवाई

कारमध्ये दिला जाणारा सीट बेल्ट हा आपल्या सुरक्षेसाठी असतो. मात्र अनेक जण स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि सीट बेल्ट लावत नाहीत. दरवर्षी रस्ते अपघातात भारतात लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. त्यापैकी हजारो मृत्यू हे सीट बेल्ट न लावल्यामुळे होतात. खरंतर लोकांनी स्वतःहून सीट बेल्ट लावला पाहिजे. मात्र यासाठी पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागतोय. अशीच माेसध्या नवी मुंबईमध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसांनी (Navi Mumbai Traffic Department) सुरू केलेल्या कारवाई मध्ये केवळ दोन तासतच ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष उपक्रमाद्वारे कारवाई करण्यात आली  आहे. चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणारे तब्बल ९०५ जण आढळून आले. रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस विभाग भर देत आहे. यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

(हेही वाचा : DCM Ajit Pawar : धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक)

चारचाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो. सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.