Navi Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला, या दिवशी होणार मेट्रोचा लोकार्पण सोहळा

23
Navi Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला, या दिवशी होणार मेट्रोचा लोकार्पण सोहळा
Navi Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला, या दिवशी होणार मेट्रोचा लोकार्पण सोहळा

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता अनेक तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु, पंतप्रधानांच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे आजतागायत हा योग जुळून आलेला नाही. त्यामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचा संभाव्य नवी मुंबई दौरा आखण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनासह नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणे पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी करण्यात गुंतली आहेत. (Navi Mumbai Metro)
नमो महिला सशक्तीकरणा’च्या देशव्यापी अभियानाकरिता नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असल्याने गेल्या एक महिन्यापासून सरकारी यंत्रणांची लगबग सुरू होती. मोदींच्या या कार्यक्रमाला सुमारे एक लाख वीस हजार महिला आणण्याचे मोठे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या विभागावर सोपवण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाकरिता तारीख निश्चित होत नसल्याने सरकारी यंत्रणांचा मोठा गोंधळ उडाला होता. हा कार्यक्रम म्हणजे भव्य सोहळा असल्यामुळे त्याची जागाही तेवढीच भव्य हवी असल्याने सरकारी यंत्रणांचा जागेचा शोधही सुरू होता.

(हेही वाचा : Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी ‘नमो महिला अभियाना’चा शुभारंभ !)

आता मोदींचे येणे निश्चित झाल्यामुळे नवी मुंबईकरांना सिडकोने तयार केलेल्या बेलापूर ते तळोजा मार्गावरील मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. अनेक वर्षांपासूनचे उरणकरांचे लोकल सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बामणडोंगरीपासून उरणदरम्यान सर्व रेल्वे स्थानके पूर्ण झाली असल्याने मोदींच्या हस्ते बेलापूर ते उरण रेल्वे मार्गाचे लोकार्पण होणार आहे. नमो महिला सशक्तीकरण अभियानातून लाखो महिला बचत गटांना नव्या सवलती मिळणार आहेत.
नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी करण्याची जबाबदारी संपूर्णत: सिडको व्यवस्थापनावर असणार आहे. तर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नमो महिला सशक्तीकरण मोहिमेच्या शुभारंभाची तयारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एमएसआरएलएम-उमेद) आदी शासकीय प्राधिकरणे करणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.