Delhi News : फटाक्यांमुळे ११ वर्षाच्या मुलाने गमावले डोळे, बंदी असतानाही असे कसे घडले याचा तपास सुरु आहे

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्या आधारे पोलीस फटाके फोडणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.

85
Delhi News : फटाक्यांमुळे ११ वर्षाच्या मुलाने गमावले डोळे, बंदी असतानाही असे कसे घडले याचा तपास सुरु आहे
Delhi News : फटाक्यांमुळे ११ वर्षाच्या मुलाने गमावले डोळे, बंदी असतानाही असे कसे घडले याचा तपास सुरु आहे

बंदी असतानाही दिल्लीत फटाके जाळले जात आहेत. दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात फटाक्याचा फटका बसल्याने एका ११ वर्षाच्या मुलाला आपले डोळे गमावले आहेत. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्या आधारे पोलीस फटाके फोडणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. (Delhi News)
बंदी असतानाही दिल्लीत फटाके जाळले जात आहेत, ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात फटाक्यांमुळे एका ११ वर्षाच्या मुलाची दृष्टी गेली. उपचारांसाठी मुलाला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलाला १७ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याची दृष्टी अद्याप परत आलेली नाही. या अपघातात मुलाच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची दृष्टी परत येणे कठीण आहे.
ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय यांनी शनिवारी सांगितले की,१५ ऑक्टोबरच्या रात्री एक ११ वर्षांचा मुलगा नमाज अदा करून शास्त्री पार्कमधील रस्त्याने आपल्या घराकडे चालला होता, त्यादरम्यान काही अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर फटाके फोडले. या फटाक्याचा फटका मुलाला बसला. त्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. (Delhi News)

(हेही वाचा :Navi Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला, या दिवशी होणार मेट्रोचा लोकार्पण सोहळा)
यासंदर्भांत डिसिपीनी सांगितले की उपचारानंतर मुलाला १७ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले. ही संपुर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्या आधारे पोलीस आता फटाके फोडणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने फटाके खरेदी, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.दिल्ली पोलिस फटाके खरेदी,विक्री आणि वापरणाऱ्या लोकांवर सतत नजर ठेवून असून अनेकांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात फटाके जप्त करण्यात आले आहेत. या सर्व प्रयत्नांनंतरही दिल्लीत फटाक्यांची बेकायदेशीर खरेदी-विक्री सुरू आहे आणि लोक सतत फटाके फोडले जात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.