CM Eknath Shinde : राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला ‘विकसित भारत’ साकार करण्याची प्रेरणा मिळेल

नाशिकला होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरू' शुभंकराचे चित्र, बोधचिन्ह, बोधवाक्याचे अनावरण

148
CM Eknath Shinde : राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला 'विकसित भारत' साकार करण्याची प्रेरणा मिळेल
CM Eknath Shinde : राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला 'विकसित भारत' साकार करण्याची प्रेरणा मिळेल

राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी (०५ जानेवारी) व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले. (CM Eknath Shinde)

या निमित्ताने नाशिक येथे महोत्सव स्थळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. माणिक कोकाटे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – 2024 Year निवडणुकांमुळे विविध देशांत ठरणार अविस्मरणीय)

शुभंकर म्हणून राज्य प्राणी शेकरुची निवड

युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा शेकरू हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबदद्ल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचं वैशिष्ट्ये सर्वासमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हांचे आणि बोधवाक्य, घोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. ‘युवा के लिए-युवा द्वारा’ हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा-समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले की, महाराष्ट्राला जी-२० (G-20) नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. आहे. त्यासाठी मोठ्या वेगाने तयारी सुरु आहे. यातून महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा ही देशभर पोहचवता येणार आहे. सोळा वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आयोजनाचं यजमानपद मिळालं आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.