१६ सप्टेंबरला फक्त ७५ रुपयात बघता येईल चित्रपट

140

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेमागृहांनी १६ सप्टेंबरला भारतात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्याचा आणि ७५ रुपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईसह, दिल्ली आणि अन्य शहरांमध्ये तिकिटांची किंमत २०० ते ३०० रुपये आहे.

( हेही वाचा : बालवाडी शिक्षकांच्या मानधनात ३ हजारांनी वाढ, मदतनीसांना मिळणार २ हजारांची वाढ )

७५ रुपयात तिकिटे 

राष्ट्रीय सिनेमा दिन असल्यामुळे देशात पीवीआर, आईनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए २, मूवीटाइम, वेव, एम२के आणि डेलाइटसारख्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार स्क्रिन्स आहेत, या सर्व सिनेमागृहांची तिकीटे ७५ रुपयांनी विकली जातील.

राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र आणेल

ही ७५ रुपयांची तिकीट ऑफर IMAX, 4DX आणि त्या आठवड्यात थिएटरमध्ये येणाऱ्या सर्व सिनेमा आणि चित्रपटांवर लागू होईल. या ऑफरमध्ये लक्झरी व्हेरिएंट समाविष्ट नसले तरी सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. असे MAI चे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र आणेल आणि संपूर्ण दिवस चित्रपटांचा आनंद घेता येईल. हे आमंत्रण त्या लोकांसाठी आहे ज्यांनी अजून चित्रपटगृहात जाऊन सिनेमाच पाहिलेला नाही असे MAI ने एका निवेदनात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.