Nagar Road Construction: नगरमध्ये ३१५ किमीचे रस्ते तयार होणार, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू

सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियत्यांची माहिती

58
Nagar Road Construction: नगरमध्ये ३१५ किमीचे रस्ते तयार होणार, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू
Nagar Road Construction: नगरमध्ये ३१५ किमीचे रस्ते तयार होणार, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू

नगर जिल्ह्यामध्ये रस्त्यांची राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग या दोन्हीची कामे (Nagar Road Construction) आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीमार्फत (PWD) नगर जिल्ह्यामध्ये ही कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत लवकरच 315 किलोमीटरचे दर्जेदार रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (Public Works Department) बांधण्यात येणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी याविषयी माहिती दिली आहे. याविषयी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये १२८६ किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे टेंडर काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले.

(हेही वाचा –  Indian Navy तर्फे कॅडेट प्रशिक्षण Naval Dockyard येथे पार पडले)

सध्या सार्जनिक बांधकाम विभागाकडे १७७३ किलोमीटर राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग ४६५५ असे एकूण ६४२८ किलोमीटरचे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सध्या आहेत. मध्यंतरी पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्या ठिकाणी नव्याने रस्ते करताना अगोदर त्याची देखभाल दुरुस्ती करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून १२८६ किलोमीटरचे रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. याबाबत कामाला सुरुवात झाली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिरूर ते नगर, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते विलद घाट त्यानंतर सर्व बायपास, यासह शिर्डी विमानतळाच्या (Shirdi Airport) अवतीभोवतीचे रस्ते यासह महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.