गेल्या काही वर्षांत मानवाधिकारवाले, डावे हे अल्पसंख्यांकांच्या अधिकारांविषयी जास्तच सतर्क असतात. इस्रायल आणि हमासच्या युद्धाच्या (Israeli–Palestinian conflict) वेळी देशातील अनेकांना हमास या आतंकवादी संघटनेला आसरा देणाऱ्या पॅलेस्टाईनचा कळवळा आला होता. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker), प्रियांका चोप्रा, करीना कपूर (Kareena Kapoor Khan) यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनाच्या त्यांच्या सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्या होत्या. ‘ऑल आईज ऑन राफाह’ (All Eyes on Rafah), या इमेज सर्वांच्या इन्स्टाग्रामवर दिसत होत्या. वक्फ विधेयकाला विरोध करण्याच्या नावाखाली बंगालमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या शिरकाणाविषयी मात्र साऱ्यांनी मिठाची गुळणी धरली आहे.
(हेही वाचा – Murshidabad Violence : ममता बॅनर्जी संविधानापेक्षा वरच्या आहेत का; मिथुन चक्रवर्ती यांचा सवाल)
रफाहमधील बॉम्बस्फोट झालेल्या तंबूंमधून बाहेर पडणाऱ्या जळालेल्या मुलांचे आणि कुटुंबांचे फोटो आपल्या सर्वांना हादरवून टाकतात. तात्पुरत्या तंबूंमध्ये आश्रय घेणाऱ्या मुलांची हत्या झाल्याचे वृत्त अविवेकी आहे. सात महिन्यांहून अधिक काळ आपण ही दुर्घटना घडतांना पाहिली आहे, ज्यामुळे हजारो मुले मारली गेली किंवा जखमी झाली. युद्धबंदी, सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका आणि मुलांची निरर्थक हत्या तात्काळ थांबवली पाहिजे, अशी युनिसेफची पोस्ट करीना कपूरने रिपोस्ट केली होती.
अलिया भट्ट या अभिनेत्रीनेही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्ट करतांना म्हटले होते की, सर्व मुलांना प्रेमाची गरज आहे. सर्व मुलांना सुरक्षितता हवी आहे. सर्व मुलांना शांती हवी आहे. सर्व मुलांना जीवन हवे आहे. सर्व मातांना त्यांच्या मुलांना त्या गोष्टी देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
आता मुर्शिदाबादमध्येही मुसलमानांच्या जमावाने निरपराध पिता-पुत्रांची हत्या केली. हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी पलायन करावे लागले. त्यांची-घरे दारे दिवसाढवळ्या जाळली जात आहेत. त्यांचा आक्रोश कुणाला ऐकू येत नाही. मुर्शिदाबादमधील निरर्थक हत्या रोखल्या गेल्या पाहिजेत, असे कुणीच म्हणत नाही. १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंच्या आक्रोशाकडेही असेच दुर्लक्ष करण्यात आले होते. ते सध्या देशभरात विविध ठिकाणी विस्थापितांचे जीवन जगत आहेत. इतक्या वर्षांनंतरही ते त्यांच्या स्वगृही पुन्हा जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील कैराना येथेही निर्माण झाली होती. त्या वेळी मानवाधिकारवाल्यांनी मिठाची गुळणी धरली होती. आता बंगालमध्ये हिंदूंचे जे शिरकाण सुरु आहे, त्याविषयीही बोलायला ही लोकं तयार नाहीत, ही शोकांतिका आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community