महापालिका आयुक्तांनी दिली Dadar ला भेट; केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्या तोडून फेरीवाल्यांना हटवण्याच्या कामाची केली पाहणी

4484
महापालिका आयुक्तांनी दिली Dadar ला भेट; केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्या तोडून फेरीवाल्यांना हटवण्याच्या कामाची केली पाहणी
मुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संपूर्ण मुंबईत धडक मोहीम हाती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग/गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरुन पाहणी केली. या पाहणी दरम्यान गगराणी यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई सुरु ठेवावी, तसेच विजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात आणि रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करुन परिसर स्वच्छ ठेवावा आदी प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करुन घेण्याचीही सूचना  गगराणी यांनी केली. (Dadar)
New Project 2024 07 01T184719.566
मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत. मुंबई महानगरातील आत्यंतिक वर्दळीचा परिसर म्हणून दादरची ओळख आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातून अनधिकृत फेरीवाले हटवल्यानंतर नागरिकांनी त्याचे स्वागत केले होते. या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला सोमवारी १ जुलै २०२४ रोजी दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली. या पाहणीप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजीतकुमार आंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (छत्रपती शिवाजी महाराज मैदान पोलीस स्थानक) मुरकुटे यांचेसह महानगरपालिकेचे तसेच दादर पोलीस स्थानकातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Dadar)
New Project 2024 07 01T184939.582
मुंबई महानगरातील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासनाला वेग द्यावा, आत्यंतिक वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने हटवावीत, जेणेकरुन नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने  महानगरपालिका मुख्यालयात पोलीस प्रशासनासमवेत नुकतीच बैठक देखील पार पडली. त्यानंतर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाले निष्कासन कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे.  (Dadar)
New Project 2024 07 01T184632.533
दादर मधील केशवसुत उड्डाणपुल खालील भागाकडून केल्या जाणाऱ्या वीज चोरीच्या जोडण्याबाबत ‘हिंदुस्तान पोस्ट’ ने सातत्यपूर्ण पाटगाव करून येथील वीज चोरीचे प्रकरण निदर्शनास आणून दिले होते. या घटनेनंतर दोन वेळा वीज जोडण्यात तोडण्याचे काम बेस्ट आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान महापालिका आयुक्त आणि आज या ठिकाणी भेट देताना प्राधान्याने वीज जोडण्यात तोडण्याचे निदेश पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाचा दिल्या आहेत. (Dadar)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.