Hindusthan Post Impact : दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्यांवर  पुन्हा कारवाई,  कनेक्शन पुन्हा तोडले

234
Hindusthan Post Impact : दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्यांवर  पुन्हा कारवाई,  कनेक्शन पुन्हा तोडले
Hindusthan Post Impact : दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्यांवर  पुन्हा कारवाई,  कनेक्शन पुन्हा तोडले
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलाखाली  (Keshavsut Flyover) जागेत स्ट्रीट लाईटमधून होणाऱ्या चोरीच्या प्रकरणा बाबत हिंदुस्थान पोस्टने (Hindustan Post) प्रसिध्द केलेल्या वृत्तानंतर बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा  धडक कारवाई केली. शनिवारी या केशव सुत उड्डाण पुलाखालील अनधिकृत वीज जोडण्या तोडून पुन्हा यासाठी वापरलेल्या वायर, केबल्स साहित्य जप्त केले.अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी अनधिकृतपणे वीज जोडण्या घेतल्याचे  निदर्शनास आल्याने त्या अनधिकृत वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची  माहिती सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी (Ajitkumar Ambi) यांनी दिली आहे. (Hindusthan Post Impact)
दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखाली गाळ्यांमध्ये या खुलेआम वीज चोरी होत असल्या बाबतचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ (Hindustan Post) ने १९ जून रोजी प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर  दुसऱ्याच  दिवशी बेस्टने महापालिकेच्या मदतीने ही कारवाई पार पाडली. त्यामुळे केशवसुत उड्डाणपूलाखालील (Keshavsut Flyover) आणि आसपासच्याचे फेरीवाल्यांकडून खुलेआम होणारा विजेचा वापर रोखण्यात यश आले होते.  बेस्ट उपक्रमाचे मोठे पथक दादर केशवसुत उड्डाणपुलाखाली धडकले आणि त्यांनी येथील प्रत्येक गाळ्यांमध्ये होणारी वीज चोरीच्या जोडण्या तोडून त्याच्या वायर ताब्यात घेतल्या. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी यावेळी वायरसह वीजेचे दिवे आणि अन्य साहित्य जप्त करून येथील सर्व कनेक्शन तोडून टाकले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील वायरच्या गुंतागुंतीच्या गाठी सोडवण्यात आल्या आहेत, त्यामुळे येथील प्रत्येक गाळा आता स्वच्छ दिसून आला होता. (Hindusthan Post Impact)
परंतु मागील बुधवारपासून केलेल्या या कारवाईची धग केवळ तीन ते चार दिवस दिसून आली होती. त्यानंतर रविवार, सोमवारपासून पुन्हा दिवे लागायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा नव्याने वायर्स मागवून विजेचे कनेक्शन जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रत्येक गाळ्यांमध्ये आता विजेचे दिवे उजळून निघाले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांना चोरीच्या विजेचे कनेक्शन देण्यामागे फेरीवाल्यांची ताकद मोठी असल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे व्याजाने पैसे देणारे सावकार असतात,त्याप्रमाणे विजेचे कनेक्शन देणारे सावकारही दादरच्या या फेरीवाल्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. या पुन्हा सुरू झालेल्या वीज चोरीच्या प्रकरणाचे हिंदुस्थान पोस्टने ‘वीज चोरीबाबत बेस्टची दिखावू कारवाई, दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील दिवे पुन्हा उजळले’ या आशयाखली वृत्त प्रकाशित केले. (Hindusthan Post Impact)
या वृत्तानंतर शनिवारी महापालिका प्रशासन आणि बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून केशव सुत उड्डाण पुलाखालील जागांमध्ये होणारी वीज चोरी पकडून त्यांच्या जोडण्या तोडून टाकल्या. पुलाच्या खालील बाजूस सर्व जागांमध्ये असलेली वीज चोरी पकडुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. (Hindusthan Post Impact)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.