मुंबईचा पाणी साठा मागील वर्षीच्या तुलनेत निम्माच

132
मुंबईचा पाणी साठा मागील वर्षीच्या तुलनेत निम्माच
मुंबईचा पाणी साठा मागील वर्षीच्या तुलनेत निम्माच

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाण्याची पातळी आता वाढू लागली असून १२ जुलै रोजी या सर्व तलावांमध्ये एकूण २७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे गत वर्षी याच तारखेपर्यंत या सर्व तलावांमध्ये ५० टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत पाणी साठा निम्मा असला तरी १२ जुलै २०२१ च्या तुलनेत सध्याचा पाणी साठा दहा टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी धरणांमध्ये १२ जुलै २०२३ रोजी सकाळपर्यंत ४ लाख ४४१ दशलक्ष लिटर अर्थात ४० हजार कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. तर मागील वर्षी या दिवसाला ७ लाख २८ हजार २८६ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा होता, तर त्या आधीच्या वर्षी २ लाख ५२ हजार ३२५ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा होता. मुंबईला सर्वाधिक पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये आजवर ८४३ मि.मी एवढा पाऊस पडला जो मागील वर्षी याच तारखेपर्यंत १२६७ मि. मी एवढा होता. या भातसा धरणांत २१ टक्के एवढा पाणी साठा आहे. तर सर्वाधिक पाऊस हा मोडक सागर धरणांत पडला आहे, त्या खालोखाल तुळशी धरणांत १३२१ मि. मी पाऊस पडला होता.

(हेही वाचा – उबाठा शिवसेनेतील अनेकांची शिवसेना प्रवेशांची यादी तयार : आता मोठ्या संख्येने होणार पक्षात प्रवेश)

तर मोडक सागर आणि तानसा धरणांमध्ये प्रत्येकी ५२ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे, तुळशी धरणामध्ये ६४ टक्के पाणी साठा आणि मध्य वैतरणा धरणात सुमारे ३९ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

१२ जुलै रोजीचा पाणी साठा

सन २०२३ : ४ लाख ४१४ दशलक्ष लिटर (२७.६५)

सन २०२२ : ७ लाख २८ हजार २८६ दशलक्ष लिटर (५०.३२)

सन २०२१ : २ लाख ५२ हजार ३२५ दशलक्ष लिटर (१७.४३)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.