Mumbai University Convocation : मुंबई विद्यापिठाचा दीक्षांत समारंभ : हर्षल कुडू यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदका’ने गौरव

Mumbai University Convocation : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा ७ फेब्रुवारी रोजी झाला. या वेळी पालघर जिल्ह्यातील हर्षल पुंडलिक कुडू याला 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक' देऊन गौरवण्यात आले.

298
Mumbai University Convocation : मुंबई विद्यापिठाचा दीक्षांत समारंभ : हर्षल कुडू यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदका'ने गौरव
Mumbai University Convocation : मुंबई विद्यापिठाचा दीक्षांत समारंभ : हर्षल कुडू यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदका'ने गौरव

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ फेब्रुवारी रोजी झाला. (Mumbai University Convocation) या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grants Commission) अध्यक्ष प्रदान जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद करांडे उपस्थित होते.

(हेही वाचा – Share Market: मोदींच्या भाषणाचा शेअर मार्केटवर परिणाम, सरकारी शेअर्सची २४ लाख कोटींची कमाई, कारण? वाचा सविस्तर…)

हर्षल कुडू याला विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण

दरवर्षी विज्ञान क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक’ (Swatantrya Veer Savarkar Memorial Gold Medal) देऊन गौरविण्यात येते. पालघर जिल्ह्यातील हर्षल पुंडलिक कुडू याने एमएस्सी पदवी प्राप्त केली आहे. त्याला विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ही स्कॉलरशीप देण्यात आली.

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत @ 2047 : Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाच्या काळात आजची युवा पिढी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार आहे. विद्यापिठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, कौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी या वेळी काढले.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली – चंद्रकांत पाटील

मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आला आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. जगभरात मुंबई विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे, असे उद्गार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mumbai University Convocation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.