Mumbai Rain : लोकल पकडताना तिचा पाय घसरला, अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण…

405
Mumbai Rain : लोकल पकडताना तिचा पाय घसरला, अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...
Mumbai Rain : लोकल पकडताना तिचा पाय घसरला, अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...

मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार (Mumbai Rain) सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे (Mumbai Local) रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली

समोर आलेल्या माहितीनुसार, पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही. (Mumbai Rain)

रेल्वे पकडण्यासाठी गर्दी

रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यातच अनेक तासापासून बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. याच गर्दीत लोकल पडकत असताना महीलेचा पाय घसरून ती रेल्वे रुळावरुन पडली. त्याचवेळी तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.