गोरेगावमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीचा बादलीत पडून मृत्यू झाला. ही मुलगी दिव्यांग होती. ती बोलू शकत नव्हती किंवा चालूही शकत नव्हती. तसेच, तिला लहानपणापासूनच अपस्माराचा त्रास होता आणि तिच्यावर चेंबूर येथील एका न्यूरोलॉजिस्टकडे उपचार सुरू होते. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मुलीच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे घरात अनेक नातेवाईक आणि पाहुणे होते. त्या रात्री उशिरापर्यंत सगळे जागे होते.(Mumbai News)
(हेही वाचा – Shreyas Iyer : बापाने बोलून दाखवलं पोराच्या मनातील दु:ख; कॅप्टन्सीची इच्छा नाही, पण किमान…)
मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत झोपली होती. सकाळी मुलीच्या आईला जाग आली तेव्हा त्यांना मुलगी बाथरूममधील बादलीमध्ये पडलेली दिसली. तिचे डोके वरच्या बाजूला होते आणि पाय बादलीमध्ये होते.कुटुंबीयांनी तात्काळ मुलीला एम. व्ही. देसाई रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी केली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तो अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.(Mumbai News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

