Saket Bridge : साकेत पुलाचे बेअरिंग तुटले, वाहतूककोंडीचा करावा लागतोय सामना

या पुलाच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने हाती घेतले आहे.

92
Saket Bridge : साकेत पुलाचे बेअरिंग तुटले, वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना
Saket Bridge : साकेत पुलाचे बेअरिंग तुटले, वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना

मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे खाडीवरील महत्त्वाच्या पुल असलेला साकेत उड्डाण पुलाच्या (Saket Bridge) लोखंडी पट्टीतील जोडणीच्या भागामधील बेअरिंगचा भाग निखळला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच कामाला सुरवात केली आहे. हे काम पूर्ण व्हायला साधारण सात ते आठ दिवस लागणार आहेत. या कामामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल लागू केले असून यामध्ये अवजड वाहतूकीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही पुढील काही दिवसतरी वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी साकेत पूल महत्त्वाचा आहे. या पुलावर उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिकच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या ठिकाणी ठाणे, कल्याण भिवंडी येथूनही हजारोजण प्रवास करतात. सध्या धोकादायक झालेल्या भागावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच ठाणे शहरात माजिवडा नाका आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.

(हेही वाचा : Eco Friendly Rakhi : पालघरच्या महिलांनी बनवलेल्या राख्यांची परदेशवारी !)

अवजड वाहतूक बंद
राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे वाहतूक पोलिसांना एक पत्र पाठविले असून त्यात या पुलावरून अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. तसेच दुरुस्ती कामासाठी पुलावरून अवजड वाहतूक बंद करावी, अशी विनंती केली आहे. या पत्रानंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी साकेत खाडी पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी घातली असून यासंबंधीची अधिसुचना त्यांनी काढली आहे. गुजरात येथून घोडबंदर मार्गे जेएनपीटीकडे तसेच नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.