Nitin Desai : नितीन देसाई यांच्याबाबत प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट; म्हणाले…

224
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून आता या पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावरून थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे.
हेही पहा – 
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते याची माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत त्यांच्या मृत्यूचे जे भांडवल करत आहेत, जे राजकारण करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. नितीन देसाई यांनी मदतीसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेतली होती की नाही. माझा दावा हा खरे आहे की नाही याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. तसेच अनेक मराठी उद्योजक उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते. पण त्यांनी त्यांना तिकडून हाकलून दिले, याची यादी मी जाहीर करणार आहे, असा इशाराही दरेकरांनी दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.