BMC : कचऱ्याच्या वाढत्या समस्येसाठी महापालिकेने नियुक्त केली सल्लागार कंपनी

136

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाला तांत्रिक आणि संचालन ज्ञान असले तरी प्रत्यक्षात या व्यवस्थापन सतत विकसित होत असल्याने नियोजन, बाजार अभ्यास आणि बाजार अभ्यास तसेच सरकारच्या नियमावलींच्या अनुषंगाने धोरण तयार करण्याचे ज्ञान या विभागाला प्राप्त व्हावे यासाठी प्रकल्प उपकमांसाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

स्वच्छ भारत अभियान २.० आणि विविध प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शकतत्वांच्या अनुषंगाने, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रकल्प विभाग हा कचरा हस्तांतरण केंद्राचे अपग्रेडेशन, लेगसी कचऱ्याचे बायोरिमेडेशन, करवले येथील सॅनिटरी लँडफिलचा विकास, महापालिकेच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणारे बांधकाम आणि पाडाव अर्थात सी अँड डी कचऱ्यावर प्रक्रिया करणे, सेंद्रिय कचऱ्याचे बायोमिथेनेशन, कचरा ते ऊर्जा प्रकल्प आणि भविष्यातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी भविष्यातील नियोजन करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा Highway : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाची होणार एसआयटीकडून चौकशी)

यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजनासाठी के.पी.एम.जी. या कंपनीची सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापन क्षेत्राचे गतिमान स्वरुप, शहरातील कचरा निर्मितीचे प्रमाण, शहराचे भौगोलिक स्थान आणि पर्यावरणीय नियमांमध्ये सतत होणारे बदल इत्यादी लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आव्हानात्मक आहे आणि प्रकल्पांसंबंधी विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने या सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाने स्पष्ट केले.

भारत सरकारचा स्वच्छ भारत मिशन, दिल्ली सरकारचे स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत येथील कामांचा दिर्घ अनुभव केपीएमजी यांच्याकडे असून त्यांचा हा अनुभव लक्षात घेता या संस्थेची निवड केल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याचा अहवाल पुढील डिसेंबर महिन्यांपर्यंत प्राप्त होईल असे विभागाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.