Mumbai Local ‘नॉट आऊट’ @१७१

वाफेच्या इंजिनापासून झालेली सुरुवात आता वंदे भारत ट्रेन, सेमी हायस्पीड इथेपर्यंत मजल मारली

110
Mumbai Local ‘नॉट आऊट’ @१७१

दररोज ७५ लाख लोकांना आपल्या अंगा-खांद्यावर खेळवणारी लोकल आज १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतात दळणवळण साधनापैकी प्रमुख असणारी मुंबईची ‘लाईफ लाइन’ (Mumbai Life Line) म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे खऱ्या अर्थाने देशाची आणि संस्कृतीची साक्षीदार आहे. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) ते ठाणे (Boribandar to Thane) असा, पहिला ३३.८ किमीचा टप्पा ५७ मिनिटात पार केला. वाफेच्या इंजिनापासून झालेली सुरुवात आता वंदे भारत ट्रेन, सेमी हायस्पीड इथेपर्यंत मजल मारली आहे. (Mumbai Local)

(हेही वाचा – IPL 2024, SRH VS RCB : ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूंत घणाघाती शतक )

पहिली ट्रेन कोणत्या कंपनीची ?

पहिली ट्रेन १७१ वर्ष (1st Local train) पूर्ण करत असून १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मुंबईच्या या पहिल्या लोकल ट्रेनने त्या काळी अवघ्या ४०० प्रवाशांना सोबत घेऊन पहिला प्रवास पूर्ण केला. भारतात इंग्लंडहून १८५२ साली रेल्वे इंजिन आणण्यात आले. त्याकाळचे सरकारी अभियंता जॉर्ज क्लार्क यांच्या मार्गदर्शनखाली पहिली रेल्वे धावली. या रेल्वेला सुरुवातीला ‘साहिब’, ‘सिंध’ आणि ‘सुलतान’ अशी वाफेची ३ इंजिन जोडण्यात आले होते. पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये मिडलँड कंपनीत विलीन झाली. (Mumbai Local)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी; शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी सामना )

आशियात आज सर्वात मोठे रेल्वे जाळे हे भारतीय रेल्वेचे असून, सध्या भारतात १ लाख १५ हजार किमीचे रेल्वे रूळ आहेत. यावरून दररोज १२ हजार ६१७ रेल्वे धावतात. तसेच रोज २३ लाख प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात.नव्या वर्षात पदार्पण करताना भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहेत.

अजूनही त्याच वेळेला गाडी सुटते.

गेल्या १७१ वर्षात रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. परंतु, रेल्वेने पहिल्या रेल्वे गाडीची वेळ आजही सीएसएमटी ते ठाणे याच स्थानकांसाठी राखून ठेवली आहे. मध्य रेल्वे आजही दुपारी ३ वाजून २८ मिनिटांनी ठाणे लोकल चालविते.  (Mumbai Local)

 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.