Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी; शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी सामना

Lok Sabha Elections 2024 : भाजपाने साताऱ्यातील जागेवर उमेदवार जाहीर करून महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

157
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी; शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी सामना
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी; शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी सामना
भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections 2024) पक्षाच्या उमेदवारांची 12 वी यादी जाहीर केली. यात भाजपाने चार राज्यांतील सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (Lok Sabha Elections 2024)
राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपाने या वेळी उमेदवार बनविले आहे. 18 व्या लोकसभेत साताऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उदयनराजे भोसले यांना निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. (Lok Sabha Elections 2024)
यामुळे साताऱ्यातील सामना आता रंगतदार होणार आहे. शरद पवार गटाने (NCP Sharad Chandra Pawar) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना रिंगणात उतरविले आहे.
2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) उदयराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिक्रिटावर निवडून आले होते. परंतु, काही वेळेनंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला आणि खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना मैदानात उतरविले. तर, शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरविले. या निवडणुकीत पाटील यांनी भोसले यांचा पराभव केला. (Lok Sabha Elections 2024)
हा पराभव उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या फार जिव्हारी लागला आहे. हिशेब बरोबर करण्याची संधी मिळविण्यासाठी त्यानी महाराष्ट्रातील अख्ख राजकारण ढवळून काढलं होतं. उदयनराजे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. 3 एप्रिल 2020 रोजी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. अर्थात आणखी दोन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे.  (Lok Sabha Elections 2024)
साताऱ्यातून लढण्याचा हट्ट त्यांनी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत रेटून लावला होता. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडे असल्याने भाजपने त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी, भाजपने आज भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली. उदयनराजे भोसले यांनी यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली. शाहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. (Lok Sabha Elections 2024)
दरम्यान, भाजप (BJP) आता साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात अजितदादा पवार यांच्या गटाला कोणती जागा देते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. कारण, अजितदादा पवार नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याची आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.