मुंबईत कोविड बाधितांची रुग्ण संख्या ६ हजार पार

85

कोविड रुग्ण वाढीचा आलेख वाढतच असून शनिवारी दिवसभरात ६,३४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या केवळ सुमारे पाचशे एवढीच आहे, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ७१२ एवढी आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांची संख्या ९० ते ९५ टक्के एवढी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

४७ हजार ९७८ चाचण्या केल्या

शुक्रवारी जिथे ४७ हजार ४७२ चाचण्या केल्यानंतर ५,६३१ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी ४७ हजार ९७८ चाचण्या केल्यानंतर ६ हजार ३४७ नवीन रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये २ हजार ७६० रुग्ण उपचार घेत होते, तर रुग्ण दुपटीचा दर हा २५१ दिवस एवढा आहे. मुंबईत गुरुवारी ४ झोपडपट्या कंटेन्मेंट झोनमध्ये होत्या, त्यांची संख्या शुक्रवारी ११ वर पोहोचली होती, तर शनिवारी ही संख्या १० एवढी होती. तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत १२५ वरून १५७ वर ही संख्या पोहोचली आहे.

(हेही वाचा बडतर्फ संपकरी एसटी कर्मचारी म्हणतायत ‘कामावर घ्या’, पण…)

दिवसभरातील रुग्ण संख्या

  • एकूण बाधित रुग्ण : ६,३४७
  • बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: ५,७१२
  • शुक्रवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण :३८९
  • एकूण दाखल रुग्ण : २,७६०
  • एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३०,५६५
  • रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : ९ टक्के
  • बरे झालेले रुग्ण : ४५१
  • विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण : २,७६०
  • दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०१
  • दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ४७,९७८
  • कंटेन्मेंट झोपडपट्टी: १०
  • सीलबंद इमारती : १५७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.