Mumbai-Goa Special Train : नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी गोव्याला जाताय ,रेल्वेच्या मुंबई-गोवा विशेष फेऱ्या

221
Mumbai-Goa Special Train : नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी गोव्याला जाताय ,रेल्वेच्या मुंबई-गोवा विशेष फेऱ्या
Mumbai-Goa Special Train : नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी गोव्याला जाताय ,रेल्वेच्या मुंबई-गोवा विशेष फेऱ्या

सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक मुंबईकर गोव्याला जातात. या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई – थिवीम , पनवेल – करमळी या दरम्यान २८ विशेष फेऱ्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे रिझर्वेशन२१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. (Mumbai-Goa Special Train)

वर्षाभरात घडलेल्या सर्व चांगल्या-वाईट घटना विसरून दरवर्षी लोक गोव्यात गर्दी करत नवीन वर्षाचे स्वागत करतात. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रात्री १२.२० वाजता गाडी क्रमांक ०११५१ दैनिक विशेष रेल्वेगाडी (१२ फेऱ्या) सुटेल आणि थिवि येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. तसेच याच काळात दुपारी ३ वाजता थिवि येथून गाडी क्रमांक ०११५२ दैनिक विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ३.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असून एक वातानुकूलित द्वितीय, तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशी या रेल्वेगाडीची संरचना असेल. (Mumbai-Goa Special Train)

(हेही वाचा :Ashtvinayak : अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री श्री गिरिजात्मज गणेश मंदिराची दुर्दशा; पुरातन विभागाकडून भक्तांची लूट, सोयीसुविधांचा अभाव 

पनवेल – करमळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) ४ फेऱ्या
गाडी क्रमांक ०१४४७ विशेष २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४८ विशेष गाडी २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून निघेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २२ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, ४ वातानुकूलित तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी अशी तिची संरचना असेल. मुंबई – थिवी, पनवेल – करमळी विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार असून, २१ नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट आरक्षण सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.