एसटीतून प्रवास करणा-या महिलांसाठी महत्त्वाची बातमी; महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

83

एसटी बस स्थानकात येणा-या स्तनदा मातांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने महिलांसाठी असलेला हिरकणी कक्ष पुन्हा पुनर्जीवीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील हिरकणी कक्ष पुन्हा सुरु केले जाणार आहेत.

प्रवासात तान्हुल्यांना स्तनपान देताना महिलांची कुचंबणा होते. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बस स्थानकात हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पहिला हिरकणी कक्ष चंद्रपूर आगारातच स्थापन केला. हा कक्ष सहज ओळखता यावा, यासाठी त्याच्या बाहेरील बाजूस लहान मुलांची चित्रे लावण्यात आली. तर ठळक अक्षरांत हिरकणी कक्ष नाव देण्यात आले. परंतु नंतर काही कारणांमुळे हिरकणी कक्षाचा निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला होता. आता या कक्षाला पुनर्जीवीत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

( हेही वाचा: जगात अशा काही जागा आहेत, ज्यावरुन विमान उड्डाण करु शकत नाही! जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये )

‘या’ ठिकाणचे हिरकणी कक्ष पुन्हा सुरु 

त्यानुसार, प्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील हिरकणी कक्षाला पुनर्जीवीत करण्यात आले. खिडकीला स्वच्छ पडदे, स्वच्छ सुंदर बिछाना, पाळणा, लहान मुलांची खेळणी अशा विविध साहित्यांनी हिरकणी कक्ष सजवण्यात आले आहेत. याप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख बसस्थानकांवर हिरकणी कक्षाचे नूतनीकरण करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानंतर मुंबई सेंट्रल, परळ व कुर्ला नेहरूनगर येथील हिरकणी कक्षाला पुनर्जीवीत करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.