महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची २०२२ साठीची पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. याअंतर्गत एकूण १६१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे
( हेही वाचा : आठवडाभराच्या आक्रोशानंतर अखेर परिचारिकांचे आंदोलन मागे)
राज्यातल्या ३७ केंद्रावर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा (गट अ) सहायक संचालक, नगरपालिका-नगरपरिषद मुख्याधिकारी (गट अ), राज्य उत्पादन शुल्क विभाग (गट ब) आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती
- परीक्षेचे नाव – राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२
-
पदाचे नाव –
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा एकूण पदे – ०९
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद – २२ पदे
- बाल विकास प्रकल्प अधिकारी – २८ पदे
- सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – २ पदे
- उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ३ पदे
- कक्ष अधिकारी – ५ पदे
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – ४ पदे
- निरीक्षित प्रमाणित शाळा व संस्था – ८८ पदे
पद संख्या – १६१ जागा
अर्ज शुल्क –
अमागास – ५४४ रुपये
मागासवर्गीय – ३४४ रुपये
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे मागासवर्गीय/अनाथ – ४३ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ मे २०२२
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जून २०२२
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in