नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी यांना ईडीने 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीच्या या कारवाईवरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. मोदी सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांना ईडीने २ जून आणि सोनियांना ८ जूनला समन्स बजावले आहे.
काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी केला. देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
हुकूमशहा घाबरला
काँग्रेस नेते सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, “मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. यावेळी त्यांनी नवे भ्याड कारस्थान रचले आहे. आता पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावली आहे. हुकूमशहा घाबरला हे स्पष्ट आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
सिंघवी म्हणाले – सूडबुद्धीने कारवाई
पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी म्हणाले, “हा एक मोठा आजार आहे. हा रोग विरोधी पक्षांना उद्देशून आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे सिंघवी म्हणाले.
Join Our WhatsApp Community