MPSC कडून ८ हजार १६९ पदांसाठी मेगाभरती! २०२३ ची पहिली आणि मोठी जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज

129

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना MPSC कडून दिलासा मिळाला आहे. राज्यात तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत.

( हेही वाचा : MSRTC: एसटीच्या काचांवर स्टीकर्स नको, महामंडळाने काढले पत्रक)

महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या उमेदवारांचा पे स्केल १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० या दरम्यान असणार आहे.

किती पदे भरली जाणार?

  • सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग – ८ पदे
  • वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
  • ग्रह विभाग पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
  • वित्त विभाग कर सहाय्यक – ४६८ पदे
  • लिपिक टंकलेखक – ७ हजार ३४ पदे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.