Mpsc Exam Date : राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आर्थिक मागासवर्गियांना OBC प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Mpsc Exam Date : कुणबी नोंदी सापडलेल्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या संबंधितचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

116
Mpsc Exam Date : राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आर्थिक मागासवर्गियांना OBC प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
Mpsc Exam Date : राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आर्थिक मागासवर्गियांना OBC प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

6 जून रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्यासाठी एमपीएससीने ही तरतूद केली आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या संबंधितचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Mpsc Exam Date)

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्याविषयीचे वक्तव्य भोवले; Rahul Gandhi ना न्यायालयासमोर हजर रहाण्याचे आदेश)

एकूण 524 रिक्त पदांचा समावेश

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प यामुळे सादर करता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र दाखवता येणार

काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदींच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्या आधारे अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येईल.

नव्याने अर्ज सादर कसा करावा ?

परीक्षेकरीता जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्जास करू शकले नाहीत. अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करता येणार आहे.

इतर मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरण उमेदवार ऑनलाईन अर्जप्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकर (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या Link च्या आधारे इतर मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील. (Mpsc Exam Date)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.