Veer Savarkar यांच्याविषयीचे वक्तव्य भोवले; Rahul Gandhi ना न्यायालयासमोर हजर रहाण्याचे आदेश

Veer Savarkar यांच्याविषयीच्या राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयासमोर हजर रहाण्याचा आदेश दिला आहे.

201
Veer Savarkar यांच्याविषयीचे वक्तव्य भोवले; Rahul Gandhi ना न्यायालयासमोर हजर रहाण्याचे आदेश
Veer Savarkar यांच्याविषयीचे वक्तव्य भोवले; Rahul Gandhi ना न्यायालयासमोर हजर रहाण्याचे आदेश

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर रहाण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवार, ३० मे रोजी दिले आहेत. राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

(हेही वाचा – Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी)

सात्यकी सावरकर यांनी दाखल केला दावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा दावा दाखल केला आहे. यामध्ये विश्रामबाग पोलिसांनी नुकताच तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आले आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा (Veer Savarkar) संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.