Monsoon Update : पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

80
Monsoon Update : पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

एकीकडे संपूर्ण राज्यासह देशात घटस्थापनेचा आनंद आणि उत्साह आहे तर दुसरीकडे या आनंदांत सहभागी होण्यासाठी वरुणदेवही (Monsoon Update) सज्ज असल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.

अधिक माहितीनुसार, पुढील ४८ तसंतमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस (Monsoon Update) पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पाऊस आपली हजेरी लावणार आहे. दरम्यान देशासह राज्यातील अनेक भागातून मान्सून परतला असला तरीही कोकणसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Operation Ajay : इस्त्रायलवरून भारतीयांना घेऊन येणारी चौथी फेरी मायदेशात दाखल; आतापर्यंत ‘इतके’ नागरिक परतले)

तसेच उत्तर प्रदेशात १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी जोरदार पाऊस (Monsoon Update) पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.