मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी

92

रात्रभर कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची मंगळवारची सकाळ गारेगार केली. मंगळवारचा अर्धा दिवस सरत आला असला तरीही ठिकठिकाणी सकाळीच ६० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, शहरात ४५ ते ५५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. बुधवारी पावसाचा जोर वाढून, मुंबईत काही भागांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळपासून पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईत पावसाचा मारा सुरु आहे. सकाळच्या साडेआठच्या नोंदीतच वांद्रे येथे ७०.५ मिमी पाऊस झाला होता. राममंदिर परिसरात ६४.५, मुंबई विमानतळ परिसरात ५६.५, चेंबूरमधील टाटा पॉवर परिसरात ६२.५ पावसाची नोंद झाल्याने, मुंबईकरांना छत्री असूनही वा-याच्या प्रभावामुळे भिजतच कार्यालय गाठावे लागले. हळूहळू पावसाचा जोर कमी होत गेला. अधूनमधून एखादं-दुसरी पावसाची सर मुंबईकरांना भिजवत होती. परंतु बहुंतांश मुंबईच्या भागांत पावसाची संततधार कमी झाल्याने, केवळ गारवा अनुभवता येत होता. केवळ भायखळ्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ७२ मिलीमीटर पाऊस झाला. परळ, गिरगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर तसेच अंधेरी आणि कुर्ला परिसरात पावसाचे अधूनमधून बरसणे सुरुच आहे. परंतु दुपारनंतर मुंबईतील ब-याच भागांत पावसाचा जोर कमी दिसून आला.

( हेही वाचा: दिल्ली ते मुंबई दरम्यान होणार इलेक्ट्रिक हायवे, गडकरींची घोषणा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.