मान्सून : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

233
मान्सून : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून लांबला होता. अखेर आता देशात सर्वत्र मान्सूनला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाने जोर धरला आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी दुर्घटना घडली आहे.

अशातच हवामान विभागाने संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे. हवामान विभागाने माहिती दिली आहे की, साधारणपणे संपूर्ण भारतात ८ जुलैपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र यंदा ८ जुलै आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. आता संपूर्ण देशात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी (२ जुलै) जाहीर केले आहे. जुन महिन्यामध्ये १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

(हेही वाचा – …म्हणून प्रशासनाने ५ हजार मशीन्स बसवण्याचा घेतला निर्णय – इक्बाल सिंह चहल)

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातही जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत आज म्हणजेच सोमवार ३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूरसह राज्यभरात रविवारी (२ जुलै) संततधार पाहायला मिळाली. हवामान विभागाने आज (३ जुलै) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढणार

जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासूनच पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र तापमानात गारवा निर्माण झाला आहे. देशभरात सर्वत्र सामान्य तापमान पाच डिग्री सेल्सिअस आणि काही भागात त्याहूनही अधिक कमी झालं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.