Monsoon : मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होणार; मुंबईत मात्र विलंब होण्याचा अंदाज

चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ ऐवजी १७ जूननंतर दाखल होण्याची शक्यता हवामानविषयक माहिती देणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तवली आहे.

161
Monsoon : मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होणार; मुंबईत मात्र विलंब होण्याचा अंदाज

मान्सूनने (Monsoon) ३० मे रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराचा, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, तसेच संपूर्ण अंदमान-निकोबार बेट, अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमधील काही भाग व्यापला. अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाल्याची माहिती आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून पुढे सक्रीय होऊन मालदीव बेट, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भाग, तसेच अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

(हेही वाचा – Electricity Demand : मुंबईत एका दिवसात ३९६८ मेगावॅट विजेच्या मागणीची नोंद)

दरवर्षीपेक्षा यावर्षी आठ दिवसांच्या विलंबाने मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. मात्र हे अंतर मान्सून पुढे भरून काढेल, असा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा – 

अशातच केरळमध्ये ३-४ जूननंतर मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात ७ ते ९ जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून गुजरात, सौराष्ट्रकडे मार्गक्रमण करेल. मात्र या चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ ऐवजी १७ जूननंतर दाखल होण्याची शक्यता हवामानविषयक माहिती देणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तवली आहे. या अंदाजानुसार दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन १० ते १२ जून दरम्यान, तर मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ७ जूननंतर लागेल. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.