– चिरायु पंडित
Surgical strike : भारताच्या फाळणीचा इतिहास आपल्याला फारसा समजलाच नाही असं म्हणायला हवं, त्यामुळेच तो इतिहास पुन्हा – पुन्हा आपल्यासमोर दत्त म्हणून उभा राहतोय. राजाजी योजना, भुलाभाई – लियाकत अली करार, जिनांशी झालेल्या वाटाघाटी, यावरुन हे स्पष्ट होते की गांधींनी पाकिस्तान निर्मितीची लीगची मागणी मान्यच केली होती. त्यांना तसे होणार याची इतकी खात्री पटली होती की त्यांनी या फाळणीच्या विरोधात उपोषण करणे देखील टाळले होते.
फाळणीच्या वेळचा नृशंस नरसंहार
फाळणीच्या फक्त एकच आठवडा आधी भारतात लीगच्या कट्टर मुसलमानांनी अत्याचारांचा कळस गाठायला सुरुवात केली होती. देशभर नुसते मृत्यूचे थैमान चालू होते. लीगच्या मुसलमानांनी अनेक प्राणघातक शस्त्रांसह हिंदूंवर अनन्वित अत्याचार चालवले होते. सक्तीने बाटवाबाटवी, स्त्रियांवर राजरोसपणे होणारे बलात्कार, जाळपोळ, हिंदूंची लुटालुट या सर्वच गोष्टींचे थैमान सबंध देशभर चालू होते. सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे, या घटनांमध्ये पोलिस कुठेच दिसत नव्हते, हिंदूंना वाऱ्यावर सोडले गेले होते. या स्थितीत हिंदूंनी काय करायला हवे होते?
पाकिस्तान सरकारच वाटत होती शस्त्रे
तत्कालीन एकसंध पंजाबमध्ये पाकिस्तान सरकारने तर क्रुरतेचा कळस गाठला होता. त्यांनीच सर्व हल्लेखोरांना शस्त्रे वाटली होती. लीगच्या नेत्यांनी भडकाऊ भाषणे करायला सुरुवात केली होती, मुस्लीम हल्लेखोरांचे लक्ष्य भारतच असायला हवा असे ते राजरोसपणे सांगत होते, मुस्लीमांनी हत्यारांसह मिरवणुका काढायला सुरुवात केली होती. त्यांचा नारा प्रसिध्द होता. ‘हंस के लिया पाकिस्तान, लड के लेंगे हिंदुस्थान‘ अशा आरोळ्या मारल्या जात होत्या. पाकिस्तानची नीती स्पष्ट होती. पंजाब मधून थेट दिल्लीवर आक्रमण करणे आणि तिथेच पाकिस्तानची स्थापना करणे हीच होती.
दिल्लीत गांधीवादी काँग्रेस सरकारचा उत्सव
इकडे एवढा भयंकर संहार सुरु असताना, दिल्लीतील गांधीवादी काँग्रेस सरकार मात्र, विना रक्त, विना शस्त्र स्वातंत्र्य मिळाले अशा समजूतीत उस्तव साजरा करण्यात मग्न होते. नेहरुंनी त्यावेळी दिल्लीत खाकसार या अतिरेकी संघटनेच्या मोर्चास परवानगी दिली होती. हेच खाकसार हे गुप्तपणे शस्त्रात्रे, स्फोटके गोळा करत होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांमध्ये ५० टक्के मुसलमान होते. त्यांचा आयुक्त देखील मुसलमानच होता. दिल्ली काबीज करण्याचे कुटील डावपेच ते आखत होते. याचवेळी फक्त हाच प्रश्न नव्हे तर, जुनागढ, हैद्राबाद, काश्मीर सारखे प्रश्न आ वासून उभे होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा
या सगळ्या गदारोळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने देशाला धोक्याचा इशाराच दिला होता. त्यांनी सांगीतले होते, की “आपण आनंदोत्सवात मग्न आहात परंतु सबंध देश हा एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे.” पण त्यांचे बोलणे हवेत विरुन गेले आणि अशा नेत्यांना जातिवादी, देशद्रोही नेते म्हणून हिणवलं गेलं.
गांधींच्या मनात सर्जिकल स्ट्राईक ?
देशात सुरु असलेल्या हत्येच्या थैमानाला, पोलिस काहीच प्रत्युत्तर देत नाहीत हे बघून सामान्य जनताच हातात शस्त्र घेऊन उभी राहिली. जनतेने प्रखर प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जनतेचा प्रतिकार इतका प्रखर होता की नेहरुंना जनतेला आवाहन करावे लागले की हल्लेखोरांना उत्तर देणे सरकारचे काम आहे. नागरिकांनी हातात शस्त्र घेऊ नये. गांधीही देशात सुरु असलेल्या थैमानाने विचलित होत होते. प्रसिध्द इतिहासकार रिझवान कादरी यांनी मनुबेन गांधींच्या २६ सप्टेंबर १९४६ डायरीच्या संदर्भावरुन असे विधान केले आहे की, गांधी इतके बावचळले होते की या वाढत्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक सारखे उपाय योजावेत का असे त्यांच्या मनात येत होते.
मोहम्मद अली जिनांची योजना
गांधींच्या घरचा एक प्रसंग आहे. त्यांचे काही मित्र त्यांना भेटायला आले होते. त्यावेळच्या चर्चेत युध्दाचा विषय निघाला. गांधी त्यावर म्हणाले “जिना अशी योजना बनवत आहेत की जुनागढ ताब्यात घेऊन ते काठियावाड जिंकतील आणि तेथून पुढे हैद्राबाद मध्ये जातील, दुसऱ्या योजनेनुसार ते लाहोरमार्गे दिल्लीवर चालून येतील“ एवढ्यात गांधी एका कुशल रणनीतीकारासारखे म्हणाले की“ मला जिनांचा कावा कळतो. मी जर युध्दाची योजना बनवायला घेतली तर मी कराची जिंकण्याला प्राधान्य देईन. आपल्याकडे जलमार्ग आहेत, स्टीमर्स आहेत, आपण हे करु शकतो. कराची हिंदूंनी वसवलं आहे, ते हिंदूंकडेच असायला हवं. लाहोरवर चालून जाण्यासाठी अमृतसरच्या मार्गाचा वापर केला पाहिजे.” एवढं सगळं बोलून सुस्कारा सोडत गांधी म्हणाले की आता माझे ऐकतो कोण? गांधींची असहायताच ते बोलून गेली.
काँग्रेसकडून पापाचे निर्लज्ज समर्थन
तो एक क्षण का होईना गांधींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या विचारांच्या विरोधात जाऊन शस्त्र उचलण्याचा इरादा व्यक्त केला होता. परंतु दुर्देवाची गोष्ट अशी की गांधींची काँग्रेस मात्र आता आपल्या पाकिस्तान निर्मितीच्या पापाचे समर्थन करताना दिसत आहे.
( संदर्भ : इंडियन एक्सप्रेस, २९ सप्टेंबर २०१९, ऐतिहासिक निवेदन : वीर सावरकर )
Join Our WhatsApp Community