मुंबईत पावसाळा संपत आला असून हिवाळ्याला सुरुवात होईल. हिवाळा सुरु झाला की, पर्यटकांचा फार मोठं आकर्षण म्हणजे माथेरानची (Matheran) टेकडी. हिवाळ्यामध्ये माथेरानच्या टेकडीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. तुम्ही देखील या हिवाळ्यात माथेरानला (Matheran) जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळ्याच्या काळात बंद असणारी नेरळ-माथेरान टॉय ट्रेन (Neral-Matheran Toy Train) शनिवार, १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे. (Mini Train)
(हेही वाचा – Pakistan मध्ये ४ आत्मघातकी हल्लेखोरांसह २५ दहशतवादी ठार; दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त)
माथेरानची राणी पुन्हा सुरु होणार
माथेरानची मिनी ट्रेन (Matheran Mini Train) हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या ट्रेनचा प्रवास खूप खास असतो. या ट्रेनमधून तुम्ही पूर्ण माथेरान फिरु शकतात. दरम्यान, ही ट्रेन पावसाळ्यात बंद असते. दसऱ्याला सुरु होते. मात्र, यंदा पावसाळा ऑक्टोबर महिन्यात लांबला त्यामुळे ही ट्रेन (Train) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही ट्रेन सुरु होणार आहे.
१ नोव्हेंबरपासून नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेन (Mini Train) सुरु होणार आहे. नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ट्रेन सुरु केली जाणार आहे. दरम्यान, मिनी ट्रेनच्या मार्गावर कामदेखील सुरु आहे. पावसाळ्यात मिनी ट्रेनच्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. याचसोबत काही भागात सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – भारतात परतण्यापूर्वी Rohit Sharma ची भावनिक पोस्ट)
माथेरानच्या ट्रेनचा ऐतिहासिक वारसा
माथेरानची मिनी ट्रेन १९०७ रोजी ब्रिटीश काळात सुरु करण्यात आली होती. सर आदमजी पिरभाय यांनी ही ट्रेन सुरु केली होती. ही ट्रेन दरवर्षी पावसाळ्यात बंद होते आणि चार महिन्यांनी सुरु होते. यंदा ही ट्रेन सुरु होण्यास महिनाभर उशिर झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

