MHADA Mumbai Mandal Lottery 2023 : अनामत रकमेद्वारे म्हाडाच्या तिजोरीत ५१९ कोटींची रक्कम जमा

लॉटरीसाठी १ लाख २० हजार ११४ अर्ज पात्र

125
MHADA Mumbai Mandal Lottery 2023 : अनामत रकमेद्वारे म्हाडाच्या तिजोरीत ५१९ कोटींची रक्कम जमा
MHADA Mumbai Mandal Lottery 2023 : अनामत रकमेद्वारे म्हाडाच्या तिजोरीत ५१९ कोटींची रक्कम जमा

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन, येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त झालेल्या १,४५,८४९ अर्जांपैकी अंतिमतः १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामध्यमातून मंडळाकडे अंदाजे रु ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. मात्र या लॉटरीत अपात्र ठरलेला अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार असल्याचे म्हाडा मुंबई मंडळाने स्पष्ट केले.

(हेही वाचा – महापालिका मुख्यालय इमारतीला गळती; आयुक्तांच्या लिफ्टलाच बसला फटका)

मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणाऱ्या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर २८ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांच्या लॉटरीसाठी २२ मे, २०२३ पासून ११ जुलै, २०२३ पर्यंतच्या या लॉटरी सोडत प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत १,४५,८४९ अर्ज प्राप्त झाले होते व त्यातील १,२२,३१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती २१७५ अर्ज हे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले होते. यासर्वांच्या अनामत रकमेचा परवाना मंडळातर्फे दिला जाईल असे म्हाडाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे. तसेच सोडतीचे स्थळ व तारीख मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडाने म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.