MHADA : म्हाडाच्या घरांसाठी दहा दिवसात केवळ १०२६ अर्ज

निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत.

69
MHADA : म्हाडाच्या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष
MHADA : म्हाडाच्या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष

म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार असून यासाठी सध्या अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५,३११ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज सादर झाले आहेत. मागील मे २०२३ च्या सोडतीतील ४,६५४ घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. परिणामी, या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे.

कोकण मंडळाच्या घरांना कायम मागणी चांगली असते. यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीत ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबईतील घरांना प्रचंड मागणी असल्याचे निदर्शनास आले होते. असे असताना मे २०२३ च्या सोडतीत मात्र ४६५४ घरांना खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. दोन हजारांहून अधिक घरे विकलीच गेली नाहीत. त्यामुळेच कोकण मंडळाने मेच्या सोडतीनंतर लगबगीने नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : UN News : प्रभावशाली देश परिवर्तनाला विरोध करत आहेत; जयशंकर यांची स्पष्टोक्ती)
कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेमधील आणि प्रथम प्राधान्य योजनेमधील घरांना कमी प्रतिसाद मिळत आहे. पीएमएवाय योजनेमधील घरे काही प्रमाणात महाग असून शहरांपासून थोडी दूर असल्याने या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. विरार- बोळींजमधील गृहप्रकल्पामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर असून कदाचित यामुळे देखील या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. विरार-बोळींजमध्ये आता लवकरच सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील सोडतीमध्ये समाविष्ट असलेली ही घरे विकली जाणार असा विश्वास कोकण मंडळाला आहे. पीएमएवाय योजनेकरिता वार्षिक उत्पन्न मर्यादा ३लाखांवरून ६ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकतील. परिणामी या घरांना देखील चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.