MHADA : म्हाडाच्या १७३ दुकान गाळ्यांच्या  इ-लिलाव

म्हाडाच्या संकेत स्थळावर अर्ज नोंदणी व अर्ज भरणा  १ मार्च पासून ,अंतिम निकाल २० मार्चला

5712
MHADA : म्हाडाच्या १७३ दुकान गाळ्यांच्या  इ-लिलाव
MHADA : म्हाडाच्या १७३ दुकान गाळ्यांच्या  इ-लिलाव

म्हाडाचा (MHADA) मुंबई गृहनिर्माण (Mumbai Housing) व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबई शहर आणि उपनगर मधील १६ निवासी वसाहतींमधील १७३ अनिवासी  अर्थात दुकान गाळ्यांच्या विक्रीकरिता इ लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. येत्या l १ मार्च, २०२४ पासून अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरवात करण्यात येणार आहे.

इच्छुक अर्जदार मंडळाच्या इ लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी म्हाडाच्या http://www.eauction.mhada.gov.in आणि  http://www.mhada.gov.in  या  अधिकृत संकेत स्थळावरून  जावून नोंदणी  अर्ज करणे, कागदपत्र  अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग होवू शकतात. ही ऑनलाइन इ-लिलाव प्रक्रिया १४ मार्च पर्यन्त सुरू राहील असे म्हाडाने जाहीर केले आहे.

(हेही वाचा- India Poverty Rate : देशात फक्त ५ टक्के लोक गरीब)

या अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाड (MHADA) अधिनियमांनुसार सामाजिक व व्यावसायिक आरक्षण ठेवण्यात आले आहे तसेच काही अनिवासी गाळे केवळ बँकेच्या वापराकरिता आरक्षित आहेत. या बाबतचा सविस्तर तपशील म्हाडाच्या (MHADA) संकेत स्थळावर माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आला आहे.  इ-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर (Milind Borikar) यांनी केले आहे.

एकूण १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता इ-लिलावाचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदार मंडळाच्या इ लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी म्हाडाच्या (MHADA) http://www.eauction.mhada.gov.in आणि  http://www.mhada.gov.in  या  अधिकृत संकेत स्थळावरून नोंदणी करणे, अर्ज करणे, कागदपत्र  अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. ऑनलाइन इ-लिलाव प्रक्रिया १४ मार्च पर्यन्त सुरू राहणार आहे. १४ मार्च २०२४ रोजी रात्री ११.५९ नंतर या इ-लिलाव सोडतीत सहभाग घेण्यासाठीची लिंक निष्क्रिय करण्यात येणार आहे.  इ-लिलाव प्रक्रियेतील ऑनलाइन बोली १९ मार्च, २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजे दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. दिनांक २० मार्च, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता  इ-लिलाव सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा- Sandeshkhali Violence : संदेशखाली येथील नराधम शाहजहान शेखविरोधात कारवाई; Netflix वरील ‘भक्षक’ चित्रपट आणि लोकसभा निवडणूक 2024)

अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता राबविण्यात येणारी प्रक्रिया ऑनलाइन असून अत्यंत पारदर्शक आहे. या गाळ्यांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस  मंडळ अथवा म्हाडा (MHADA) जबाबदार राहणार नाही,  असे बोरीकर (Milind Borikar) यांनी इ-लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.