October Heat : राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात, १० दिवस सोसाव्या लागणार कडक उन्हाच्या झळा

तापमानात सरासरी एक-दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन थंडीची चाहूल लागेल.

110
October Heat : राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात, १० दिवस सोसाव्या लागणार कडक उन्हाच्या झळा
October Heat : राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात, १० दिवस सोसाव्या लागणार कडक उन्हाच्या झळा

राज्याच्या सगळीकडे उन्हामुळे चांगलेच चटके बसु लागले आहेत. तसेच घामाच्या धारा लागल्या आहेत. तसेच पाऊस परतल्यामुळे राज्यात बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा दिवस राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितलं आहे. (October Heat )

विदर्भातील तापमान सरासरी ३५ अंशांवर गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा सरासरी ३४ अंशांवर आणि मुंबईसह कोकणात तापमान सरासरी ३३ अंश सेल्सिअसवर आहे. पुढील दहा दिवस ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार आहेत. तापमानात सरासरी एक-दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन थंडीची चाहूल लागेल.

(हेही वाचा : World Cup 2023 :विराट ,रोहितची फटकेबाजी ,आठ गडी राखुन भारताचा अफगाणिस्तानवर विजय)
मोसमी वारे वेळेत माघारी गेले असले तरीही, मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४ दिवस अगोदर मोसमी वारे राज्यातून माघारी गेले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. सध्या सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे भारतीय उपखंडाला जास्त उष्णता मिळत आहे. मोसमी वाऱ्याच्या माघारीनंतर राज्यावर हवेच्या जास्त दाबाची स्थिती तयार झाली आहे, या स्थितीत ढगांची निर्माती होत नाही. त्या शिवाय देशातील वातावरणावर ऑगस्टपासून एल-निनोचा प्रभाव दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऑक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील दहा दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (October Heat )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.