Metro 6 : कांजूरमार्ग मेट्रो ६ कारशेडचा मार्ग मोकळा; इतक्या कोटींच्या निविदा मंजूर

89
Metro 6 : कांजूरमार्ग मेट्रो ६ कारशेडचा मार्ग मोकळा; इतक्या कोटींच्या निविदा मंजूर

दीड वर्षांपूर्वी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून (Metro 6) मविआ विरुद्ध भाजप असे चित्र होते. मात्र आता कांजूरमार्गमध्ये मेट्रो ६ साठी कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो कारशेडच्या ५०६ कोटींच्या प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे कारशेड उभारण्याच्या कामाला वेग येण्याची चिन्हं दिसत आहेत.

कांजूरमार्ग (Metro 6) कारशेडसाठी राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर आता मेट्रो कारशेड उभारण्याचं काम जलद गतीनं सुरू करण्यात येईल. या कारशेड उभारणीच्या कामांमध्ये १८ स्टेबलिंग लाईन्स, वर्कशॉप, मेंटेनन्स लाईन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग सुविधा, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर आणि स्टाफ क्वार्टर्स यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा समावेश असेल. कॉन्ट्रॅक्टरला इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर हा प्रकल्प ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित आहे. मेट्रो ६ मार्गिका (Metro 6) पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणार असून जी स्वामी समर्थ मार्ग ते जोगेश्वरीपर्यंत असणार आहे.

(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरु)

मेट्रो ६ ची मार्गिका

‘मेट्रो ६’ ही (Metro 6) मार्गिका पूर्वेकडे विक्रोळी ते पश्चिमेकडील जोगेश्वरीदरम्यान उभारण्यात येत आहे. या मार्गिकेवरुन पूर्व द्रुतगती मार्ग ते स्वामी समर्थनगर यादरम्यान मेट्रो धावणार आहे. एकूण १५.३१ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेवर १३ स्थानकं असतील. प्रामुख्याने सध्याच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला (जेव्हीएलआर) समकक्ष अशी ही मार्गिका धावणार आहे. यादरम्यान ही मार्गिका विक्रोळी आणि जोगेश्वरी, या दोन स्थानकांना पार करणार आहे. मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या उन्नत पुलांची उभारणी झपाट्यानं पूर्ण होत असताना आता सुविधांसाठी हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.