Medha Patkar यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय आहे? 

139
Medha Patkar यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय आहे? 
Medha Patkar यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय आहे? 

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या (Narmada Bachao Andolan) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या न्यायालयाने पाच महिने साधा कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष तथा सध्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना (V. K. Saxena) यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात २३ वर्षानंतर मेधा पाटकरांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Medha Patkar) 

महानगर दंडाधिकारी राघव शर्मा (Metropolitan Magistrate Raghav Sharma) यांनी पाटकर यांना या प्रकरणात दोषी ठरवलं. तसेच सक्सेना यांच्या झालेल्या बदनामीच्या भरपाईपोटी त्यांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३८९ (३) अन्वये पाटकर यांची शिक्षा १ ऑगस्टपर्यंत स्थगित केली असून या आदेशाला आव्हान देण्याची मुभा दिली आहे. तसेच कोर्टाने त्यांचे वय आणि प्रकृतीची परिस्थिती पाहत त्यांना जास्त शिक्षा देता येणार नाही असे घोषित केले. कोर्टाने एका महिना आधीच मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. पाटकर त्याचा निकाल राखून ठेवला होता, दरम्यान सोमवारी कोर्टाने निकाल जाहीर केला. (Medha Patkar)

(हेही वाचा – नेपाळमध्ये Muslim यांनी हिंदू गावाचे नाव बदलून केले ‘मोहम्मद नगर’, हिंदू तरुणालाही मारहाण)

नेमके प्रकरण काय?

साधारण २३ वर्ष जुने प्रकरणात मेधा पाटकर यांना आता शिक्षा झाली. २००२ साली नर्मदा बचाओ आंदोलनात वी के सक्सेना आणि मेधा पाटकर वाद समोर आला होता. मेधा पाटकर यांनी वी के सक्सेना यांच्याबद्दल अपमानजनक शब्द आणि आरोप केले आहेत असा दावा करत वी के सक्सेना यांनी पाटकर यांच्या विरोधाच मानहानीचा दावा ठोकला होता. (Medha Patkar)

(हेही वाचा – दीक्षाभूमीतील भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती; DCM Devendra Fadnavis यांची माहिती)

काय म्हणाल्या होत्या मेधा पाटकर? 

मेधा पाटकर यांनी वी के सक्सेनावर आरोप करताना “वी के सक्सेना देशभक्त नसून एक भित्रा माणूस आहे, हवाला व्यवहारात यांचा संबंध आहे” असा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. कोर्टाने हे विधान मानहानीजनक मानले असून समाजात त्याची प्रतिमा विधानाने डागळली जाते असे मत नोंदवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर मेधा पाटकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. सत्य कधीच हरत नाही, मी कोणावरही मानहानीजनक टिप्पणी केली नाही. मी माझे काम करत राहिले, कोर्टाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाईन अशी प्रतिक्रिया मेधा पाटकर यांनी दिली. (Medha Patkar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.