सामाजिक भान जपत पारंपरिक पद्धतीने विजय माने यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न

विघ्नहर सहकारी पतसंस्थेचे संचालक विश्राम म्हसे यांचा मुलगा भुषण म्हसे यांच्याशी हा विवाह 16 मे रोजी झाला.

171

नवी मुंबई शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक विजय माने यांची कन्या अश्विनी हिचा विवाह नुकताच संपन्न झाला. विघ्नहर सहकारी पतसंस्थेचे संचालक विश्राम म्हसे यांचा मुलगा भुषण म्हसे यांच्याशी हा विवाह 16 मे रोजी झाला. माने यांच्या अनावळे (सातारा) या स्वतःच्या गावी सुंदर अशा पारंपरिक पद्धतीने हा सोहळा झाला.

vivah

माजी नगरसेवक विजय माने हे साताऱ्याच्या एका सामान्य कुटुंबातील आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करून विजय माने यांनी नवी मुंबईमध्ये स्वतःच राजकीय वलय निर्माण करत समाजसेवा केली. विजय माने हे बाळासाहेबांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आहेत. बाळासाहेबांच्या या तत्वानुसार त्यांनी सामाजिक भान ठेवत या सोहळ्यानिमित्त काही सामाजिक कार्यातून चांगला आदर्श लोकांसमोर ठेवला. राजकारणापलीकडे जपलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे या लग्न सोहळ्याला सर्व राजकीय पक्षांमधील अनेक पदाधिका-ऱ्यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, काँग्रेस जिल्हाप्रमुख अनिल कौशिक, शिवसह्याद्री पतपेढी अध्यक्ष भाई वांगडे, मराठा महासंघ नेते दादा जगताप, पुणे उद्योजक राम जगदाळे, आमदार सदाभाऊ संपकाळ तसेच सर्व पक्षीय नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा The Kerala Story : ‘मी इतकी कट्टर झाली होती की जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ठार मारले असते; धर्मांतराच्या कचाट्यातून बाहेर पडलेली पीडिता सांगते)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.