Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चढाओढ; आघाडीत होऊ शकते बिघाडी

लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) बिघाडी होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती.

203
MVA च्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान; डॉ. धैर्यशील पुंडकर बैठक अर्धवट सोडून बाहेर

महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. तिन्ही पक्षांनी अर्थात ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे.सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यासाठी आता मविआडीने तयारी सुरू केल्याचे दिसते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजारा देत आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे म्हटले आहे.

आम्ही १९ जागा जिंकल्या आहेत. – संजय राऊत

पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रच लढणार आहे. आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मागीलवेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल.

(हेही वाचा – Modi@9 : भाजपाकडून ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियान; देवेंद्र फडणवीसांचे ११ शिलेदार मैदानात)

रामटेक लोकसभा आम्हीच लढणार – कुणाल राऊत

विदर्भातील रामटेक लोकसभा ही शिवसेनेनं जिंकलेली जागा आहे परंतु ती आता आम्हीच (Maha Vikas Aghadi) लढणार असल्याचा दावा काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली असल्याने लोकसभेला अजून एक वर्ष बाकी असताना देखील जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आघाडीत जागा वाटपावरून अडचण निर्माण करू नये. – नाना पटोले

जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील याची चर्चा व्हावी ही कॉंग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये अडचण निर्माण करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी राऊतांच्या विधानावर म्हटले.आमच्या तिन्ही पक्षांकडून ३-३ लोक देऊन ९ लोकांची समिती केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) बिघाडी होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.