Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या प्रगणकांना आता वेगवेगळे अनुभव येत असून प्रगणक माहिती जाणून घेताना वेगवेगळे अनुभव येत आहे. प्रगणकांकडून जातीबाबतची माहिती जाणून घेताना, कुटुंबाकडून जात सांगतो, पण पैसे देणार का असा सवाल केला जात असल्याचा अनुभव प्रगणकांना येत आहे.

344
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या प्रगणकांना आता वेगवेगळे अनुभव येत असून प्रगणक माहिती जाणून घेताना वेगवेगळे अनुभव येत आहे. प्रगणकांकडून जातीबाबतची माहिती जाणून घेताना, कुटुंबाकडून जात सांगतो, पण पैसे देणार का असा सवाल केला जात असल्याचा अनुभव प्रगणकांना येत आहे. त्यामुळे आम्हाला दिलेल्या माहितीनुसारच हे प्रश्न आम्ही विचारत असून आम्हालाच याचे पैसे मिळतील की नाही याची माहिती नाही, तर तुम्हाला पैसे कुठून देणार असे सांगत प्रगणकांकडून कुटुंबांचे समाधान केले जाते. (Maratha Reservation Survey)

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला मंगळवारी २३ जानेवारीपासून सुरुवात झाल्यानंतर समस्या आणि त्रासालाच प्रगणकांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वेक्षणासाठी स्वत:चा अँड्राईड मोबाईलचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांच्या मोबाईल मधील डेटा फुल आहे तर काहींच्या मोबाईलची बॅटरी त्वरीत उतरली जाते. त्यामुळे या ऍपचा वापर करताना अनेकांच्या मोबाईलची बॅटरी त्वरीत उतरली जाते. त्यातच अनेक कुटुंबांकडून माहिती देण्यास नकार दिला जातो. (Maratha Reservation Survey)

(हेही वाचा – HDFC Bank Credit Cards : एचडीएफसी बँकेची २ कोटी क्रेडिट कार्ड वापरात )

कुटुंबांकडून अडवणूक करण्याचा प्रयत्न

मात्र, या सर्वेक्षणामध्ये प्रगणकांकडून कुटुंबातील सदस्याला जात कुठली असा प्रश्न केला जातो. परंतु अनेकांकडून आमची जात का सांगायची, आम्ही जात सांगितली तर महापालिका आम्हाला पैसे देणार का? आम्ही जात सांगतो पण तुम्ही आम्हाला पैसे द्या अशाप्रकारे प्रश्न करत कुटुंबांकडून अडवणूक करण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र, प्रगणक आपल्या स्तरावरच त्या सर्वांना याची माहिती देऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. (Maratha Reservation Survey)

या सर्वेमध्ये आधीच कुटुंबातील सदस्यांकडून कोणताही प्रतिसाद तथा सहकार्य देत नाही. तसेच काही जण आधार कार्ड नंबर देत नाही, तर कुणी मोबाईल क्रमांक देत नाही. मोठ्या टॉवर्समध्ये तर प्रवेशच दिला जात नाही. विशेष म्हणजे या सर्वेक्षणासाठी ५५ वर्षांवरील महिला तसेच पुरुषांनाही कामाला जुंपल्याने काही कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आरक्षित प्रवर्गातील कुटुंबासाठी केवळ दोनच प्रश्न असले तरी खुल्या प्रवर्गातील कुटुंबासाठी १८७ प्रश्नांची माहिती गोळा करावी लागते. त्यामुळे जिथे जिथे प्रगणकांना अडचणी येतात तिथे पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझरशी संपर्क साधून कल्पना दिली जात असल्याचे प्रगणकांकडून सांगण्यात येते. (Maratha Reservation Survey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.