Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही – मनोज जरांगे पाटील

92
Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही - मनोज जरांगे पाटील

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु आहे. अशातच त्यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच शनिवार २१ ऑक्टोबर रोजी मनोज पाटील यांची सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये सभा झाली. या सभेत बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा मराठा बांधवाना सूचक सल्ला दिला. तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की; “आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही.”

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“आपल्यावर खूप अन्याय (Maratha Reservation) झालाय, या अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला पाहिजे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, आपण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही.”

(हेही वाचा – Emergency Landing : ‘माझ्या बॅगमध्ये बॉम्ब आहे’; अक्सा एअरच्या विमानाला प्रवाशाकडून धमकी)

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही

मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) पुढे म्हणाले की, आपल्या जातीवर अन्याय होतो आहे, म्हणून आपण एकजुट झालो. त्यामुळे असच आपण एकजुटीने सोबत राहील पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे. शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला. आजपर्यंत सुरु आहे. मात्र सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात, आता त्यांचाच नंबर आहे. आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सु्ट्टीच नाही. 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिल आहे. त्यांची मुलं उन्हात पडली आहेत, त्यांच्यावर मायेचं छत्र ठेवावं लागणार आहे. हा पहिला आणि शेवटचा लढा समजून आरक्षण मिळालच पाहिजे, इतक्या ताकदीने लढा लढायचा आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.